सेलू: सिंदी येथे कृषी विभागाची कारवाई; विना परवाना कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्या केंद्रावर धाड, ₹६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Nov 23, 2025 शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे मोठी कारवाई करत विना परवाना व मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खते विक्री करणाऱ्या केंद्रावर धाड टाकली. या कारवाईत ६ लाख ५५ हजार १०९ रुपये किंमतीचा अवैध कीटकनाशक व खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ता. २२ शनिवारला कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली. ही कारवाई उशिरा रात्री ११.३० पर्यंत सुरूच होती. अशी माहिती ता. २३ ला सिंदी पोलिसांकडून मिळाली.