यवतमाळ: बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपले ज्ञान अद्यावत करावे ; जिल्हाधिकारी
यवतमाळ जिल्हा वार्षिक योजना 2024-25 नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व आश्रमशाळेतील वर्ग 5 ते 8 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक (मोबाईल ॲप) स्वरुपात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची मिशन कॉम्पेटिटिव एक्सीलेंस या अंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण वर्ग दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सभागृह यवतमाळ येथे घेण्यात आला.