हिंजवडी फेज 1 मधील एका नामांकित आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे प्राप्त झाली आहे. मर्सिडीज इंटरनॅशनल स्कूलच्या मेलवर धमकीचा संदेश आल्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. यानंतर बीडीडीएस पथक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले असून शाळेची सखोल तपासणी सुरू आहे