सेलू: कान्हापूर शिवारात शेतीच्या वादावरून वृद्धास मारण्याची धमकी. सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Nov 23, 2025 शेतातील धुराच्या वाद विकोपाला जाऊन एकाने वृद्धास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही घटना ता. २१ ला सकाळी ९.३० वाजता तालुक्यातील कान्हापूर शेत शिवारात घडली. अरुण दमडूजी सत्यकार वय ६७ रा. गजानन नगरी सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास रमेश सत्यकार रा. कान्हापूर याचे विरुद्ध ता. २२ ला रात्री १० वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती दि. २३ रविवारी सेलू पोलिसांनी दिली.