औंढा नागनाथ: हिंगोली मार्गावर सुरेगाव पाटी जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू; चालकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर सुरेगाव पाटी जवळ मित्रासह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकास भरधाव टाटा मॅजिक क्रमांक एमएच 38-4847 या वाहनाने जोराची धडक दिल्याने विजय केशव पाटोळे वय 23 वर्षे राहणार सरकळी तालुका जिल्हा हिंगोली यांचा मृत्यू झाला याप्रकरणी विशाल भाऊराव पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मॅजीक टाटा मॅजिक च्या चालकावर दिनांक 12 नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे