कामठी: शिक्षक सहकारी बँकेत बोगस मतदान ; एक महिला आणि तीन युवक ताब्यात तिघे फरार
सगळीकडे बोगस मतदानाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात देखील बोगस मतदान करताना रंगेहात एक महिला व तीन युवकांना ताब्यात घेण्यात आली आहे.आज नगरपरिषदेसाठी मतदान सुरू आहे अशातच जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन येथील शिक्षक सहकारी शाळेत बोगस मतदान करताना एक महिला आणि तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तीन युवक फरार झाल्याची माहिती ही समोर आली आहे.