साकोली: मंगलमूर्ती सभागृहात विश्वकर्मा राज मिस्त्री असोसिएशन सेंदूरवाफा साकोली यांनी गुरु विश्वकर्मांचा साजरा केला जयंती उत्सव
विश्वकर्मा राज मिस्त्री असोसिएशन सेंदूरवाफा साकोलीच्या वतीने गुरु विश्वकर्मा यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.दोन दिवशीय जयंती उत्सवात मूर्तीची स्थापना पूजन मिरवणूक विसर्जन व महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बुधवार दि.17 सप्टेंबरला दुपारी तीन ते रात्री सात या वेळात मूर्तीची मिरवणूक व विसर्जन करण्यात आले या कार्यक्रमाला साकोली तालुक्यातील सर्व प्रकारचे कारागीर,दुकानदार उपस्थित होते