माण: मलवडी येथे पाच हजार वृक्षारोपणाद्वारे वसुंधरा समृद्धी फाउंडेशनचे उद्घाटन; मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती
Man, Satara | Oct 25, 2025 मलवडी, ता. माण येथे वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेचा उद्घाटन सोहळा आणि पाच हजार वृक्षारोपण कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी चार वाजता झाले. सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक हणमंतराव जगदाळे, ग्रामविकास पंचायतराज विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी नारायण गोरे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील, ज्योती ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा सुखदेव सस्ते उपस्थित होते.