हिंगणघाट: वडनेर येथे घराच्या पायऱ्यावर पडून जखमी ३९ वर्षीय तरुणाचा सेवाग्राम रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील आशिष भातुकुलकर वय ३९ वर्ष हे घराच्या पायऱ्याने उतरत असताना त्यांचा तोल जाऊन पोर्चवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाले त्यांना उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. मृतक आशिष भातुकुलकर हा रात्रीच्या दरम्यान आपल्या वरच्या रूममध्ये झोपण्यासाठी जातो असे म्हणुन वरती खोलीमध्ये गेला व काही वेळाने परत खाली येत असतांनाच तोड जाऊन पडला.