दिंडोरी: वनी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आलेले वणीच्या तलाठ्यांना घातला महिलांनी घेराव
Dindori, Nashik | Sep 17, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आलेले वणीचे तलाठी बाळकृष्ण भामरे यांना शंकेश्वर नगर मधील महिला एकत्र येत त्यांनी आधी घेराव घालत आमचे रो हाऊस चे सातबाराला का नोंदवून घेत नाही असा सवाल त्यांनी तलाठ्यांना उपस्थित केला .यावेळेस वनी गावाचे उपसरपंच विलास कड यांनी मध्यस्थी केली व नंतर तलाठी यांनी महिलांना त्रुटी समजून सांगितल्या यावेळेस महिलांनी ग्रामपंचायतला सुद्धा धारेवर धरले .