कुही: पाचगाव शिवारात वीटभट्टी वर काम करणाऱ्या 2 बाल मजुरांची सुटका, आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Nov 21, 2025 पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या पाचगाव शिवारात वीटभट्टी वर काम करणाऱ्या 2 बाल मजुरांची सुटका करून वीटभट्टी मालकविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की गुप्त माहितीच्या आधारे कामगार विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचे संयुक्त पथकाने पाचगाव शिवारात वीटभट्टी वर पाहणी केली असता 2 बाल कामगार धोकादायक यंत्रावर काम करताना आढळून आले. त्यावरून वीटभट्टी मालकविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.