चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे आज मोठा गोंधळ उडाला. राम मल्लेश दुर्गे (वय ४०) या मतदाराने मतदान प्रक्रियेदरम्यान ठरवून आलेल्या चिन्हचे बटन दाबल्यानंतर अचानक दुसऱ्याच' चिन्हाचा दिवा लागल्याचा आरोप करत संतापाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडून टाकली. सदरची घटना ५. २० मिनिटाच्या सुमारास घडली.