रामटेक: गडमंदीर परिसरातील किरण पॉइंट वळणावर अनियंत्रित कार रस्त्याच्या कडेला उतरली
Ramtek, Nagpur | Nov 6, 2025 गड मंदिर परिसरात त्रिपुर पौर्णिमेनिमित्ताने बुधवार व गुरुवारला रामभक्तांची मांदियाळी व वाहनांची मोठी वर्दळ आहे. याच दरम्यान गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान गडमंदिर ते पापधूपेश्वर मार्गाने येणारी कार क्रमांक एम एच 49 सीडी 29 61 ही या मार्गावर असलेल्या किरण पॉइंट परिसरातील यु वळणावर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या डाव्या बाजूला उतरली. या बाजूने पहाडीचा उतार असल्याने कार मधील सर्वच थोडक्यात बचावले. यावेळी कार मध्ये युवक चालक व चार महिला असल्याचे कळते.