अरणगाव ते वाळुंज बायपास रस्त्यावर भाबर्डी गोमट फाटा येथे पाच डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास द बर्निंग बसचा थरार पहावयास मिळाला रस्त्याने धावत असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली काही वेळातच आग मोठ्या प्रमाणावर भडकली मात्र त्या परिसरात रात्री वाहनांची तपासणी करणाऱ्या आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत बसमधील 35 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले या दुर्घटनेत बस पूर्ण जळून खाक झाली आहे