मोर्शी: महाराणा प्रताप चौक चांदूरबाजार येथील युवकाची, आरटीओ च्या नावाने मोबाईलवर मेसेज टाकून फसवणूक. पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक सात नोव्हेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोबाईलवर आरटीओ च्या नावाने सिग्नल तोडल्याबद्दल हजार रुपये दंड भरण्याबाबत मेसेज व सोबत एक अनोळखी लिंक टाकून दोन लाख 40 हजार 935 रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार दिनेश उत्तमराव कथे यांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे