हडपसर परिसरात कोयत्याने हल्ल्याची आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 'मित्र सापडला नाही म्हणून' कोयताधारी युवकांनी निष्पाप तरुणावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना साडेसतरा नळी परिसरात घडली आहे. हल्ल्यादरम्यान आरोपींनी 'याला म्हणतात AB कंपनी!' असे म्हणत कोयत्याने वार केले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.