कराड: कराड तालुक्यातील मलकापूर शहराजवळ किरकोळ वादातून मित्रानेच मित्राला संपवलं,आरोपीला अटक
Karad, Satara | Nov 2, 2025 सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. कराड तालुक्यातील मलकापूर शहरात किरकोळ कारणावरून एकाला धारधार शस्त्रास्त्राने भोकसल्याची घटना घडली. दोन मित्रांमधील किरकोळ भांडणातून खून झाला आहे. सुदर्शन चोरगे असं खून झालेल्या 26 वर्षीय युवकाच नाव आहे त्यांच्यावर उपचार सुरु होते, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, द कराड तालुक्यात गुन्गेगारीचे प्रमाण वाढत असल्यांच चित्र पाहायला मिळत आहे. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत आठवड्यात दुसरा खून झाला आहे. संशयीत आरोपी आदित्य देसाई याला अटक केली.