कुही: सिल्ली शिवारात मोटारसायकल स्लीप झाल्याने तरुणाचा मृत्यू
Kuhi, Nagpur | Nov 26, 2025 पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या सिल्ली शिवारात वळणावर मोटारसायकल चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेली दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्षय रामचंद्र वालदे वय 25 राहणार कुंभारपुरा कूही असे मृतक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कूही पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय कूही येथे पाठवीला असुन कूही पोलीसात नोंद केली असून तपास कूही पोलीस करीत आहेत.