वर्धा: बोलण्यावर नाही करण्यावर विश्वास,वर्धा शहराचे अनेक प्रश्न सोडवण्याचा निर्धार: सुधीर पांगुळ
Wardha, Wardha | Dec 1, 2025 “बोलण्यावर नाही, करण्यावर विश्वास”— अशा शब्दांत सुधीर पांगुळ यांनी वर्धा शहरातील सर्वांगीण विकासाचा दृढ निर्धार व्यक्त केला. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. विकासाला गती देण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहकार्यही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा कायापालट घडवण्यासाठी प्रामाणिक आणि पारदर्शी कामकाजावर भर दिला जाईल, असेही पांगुळ यांनी नमूद केले.