खडकी परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. शाहिद रशिद शेख (वय ३७, रा. पंचशीलनगर, येरवडा) जुना मुंबई–पुणे हायवेवरील चर्च चौक येथे दुचाकीने जात असताना, अज्ञात दुचाकीस्वाराने वाहतुकीचे नियम न पाळता बेफिकीर व अविचाराने वाहन चालवत त्यांना जोराची धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत शाहिद यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३१७/२०२५ भा.